Monday, July 30, 2012

तुझ्यासंगे



तुझ्यासंगे
गच्चीत बसून पावसात या ओल्या गार
रेलिंग वरचे थेंब मजेत हसती हजार
पहिल्या या जोरदार  पावसात गरम गरम चहा
दर वर्षी याच गोष्टीचा आनंद होतो पहा
कुंडीतल्या मातीत थेंबे पटापट पडती ओली
त्यांच्या संगे नाचतात हिरवी पाने नि वेली
टपटप टपटप तालावर मन ही नाचे माझे
तुझ्यासंगे पावसात या चिंब भिजावे वाटे
n  रश्मि गोरे
n  १७ -६-१२