तुझ्यासंगे
गच्चीत बसून पावसात या ओल्या गार
रेलिंग वरचे थेंब मजेत हसती हजार
पहिल्या या जोरदार पावसात गरम गरम चहा
दर वर्षी याच गोष्टीचा आनंद होतो पहा
कुंडीतल्या मातीत थेंबे पटापट पडती ओली
त्यांच्या संगे नाचतात हिरवी पाने नि वेली
टपटप टपटप तालावर मन ही नाचे माझे
तुझ्यासंगे पावसात या चिंब भिजावे वाटे
n रश्मि गोरे
n १७ -६-१२
Keep Writing :)
ReplyDeleteSweet
ReplyDeletemarathit pan????
ReplyDelete